शिशूंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा

By Admin | Updated: June 8, 2017 06:21 IST2017-06-08T06:21:57+5:302017-06-08T06:21:57+5:30

नवजातांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत बाळांच्या पालकांनी केली आहे

CBI inquiry into Shiv's death | शिशूंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा

शिशूंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) दगावलेल्या नवजातांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत बाळांच्या पालकांनी केली आहे. बुधवारी यासंबंधीचे निवेदन न्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या प्रकरणातील दोषी डॉ. भूषण कट्टा व परिचारिकेला अटक करण्यात आली आहे. तथापि, पोलीस तपास संथगतीने सुरू असून, नवजातांच्या मृत्यूसाठी जबाबदार डॉ. भूषण कट्टा, डॉ. राजेंद्र निस्ताने, पीडीएमसीचे डीन डॉ. दिलीप जाणे, डॉ. पंकज बारब्दे, डॉ. प्रतिभा काळे यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या पालकांनी केला आहे.

Web Title: CBI inquiry into Shiv's death