शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

काजू कतली ‘आॅल टाईम फेवरिट', बंगाली मिठाई यंदा देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 11:47 IST

सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम आहे. दसराही अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मिठाई खरेदीचीही लगबग सुरु आहे.

ठळक मुद्देकाजू कतली ‘आॅल टाईम फेवरिट’ असल्यामुळे सर्वाधिक पसंती काजू कतलीलाच आहे.

- अक्षय चोरगेमुंबई -  सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम आहे. दसराही अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मिठाई खरेदीचीही लगबग सुरु आहे. सध्या सर्वच प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी उसळत आहे. बंगाली मिठाई यंदा देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. बंगाली मिठाई पाठोपाठ विविध रेंजमधील काजू कतलीही खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या नवरात्रौत्सवात बंगाली मिठाईची चव आवडीने घेतली जात आहे.

काजू कतली ‘आॅल टाईम फेवरिट’ असल्यामुळे सर्वाधिक पसंती काजू कतलीलाच आहे. त्यासोबतच मोतीचूर लड्डू, बाकरवड्या, सातारी कंदी पेढे, रसमलाई, मिष्टी दोई, खिर कोदम हे महाराष्ट्रीय आणि बंगाली पदार्थदेखील मुंबईकरांच्या जीभेवर सध्या रुंजी घालत आहेत. मिठाई आणि पेढ्यांच्या किंमती पाचशे रूपयांपासून आहेत. तर काजू कतली ८०० ते १५०० रूपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खास पश्चिम बंगाल वरून कारागिर मुंबईत दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिठाई आणि पेढ्यांसह लाडू, बर्फी आणि कित्येक प्रकारच्या स्विट्सनाही मोठी मागणी आहे. त्यात प्रामुख्याने गुलाबजाम, जिलेबी, रसगुल्ला, चॉमचॉम या पदार्थांचा समावेश आहे.खास बंगालमधून कारागीरनवरात्रौत्सवात बंगाली मिठाई हा खवय्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. मुंबईत बंगाली लोकसंख्या वाढलेली आहे. बंगालींसह मराठी जनांना बंगाली मिठाई मनापासून आवडते. त्यामुळे बंगाली मिठार्इंची मागणी वाढत आहे. खास नवरात्रौत्सवासाठी नेहमीपेक्षा अधिक कारागीर कोलकाताहून आले आहेत. कारागिरांना नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. मिष्टी दोई, नलेन गुडेर, खिर कोदम, चॉमचॉम, रसमलाई अशा पदार्थांना विशेष मागणी आहे. पदार्थांच्या किंमती मात्र स्थिर आहेत.- चंचल चक्रवर्ती, बंगाली मिठाईच्या दुकानाचे मालकबदाम कतली ७०० ते १२०० रूपये किलोकाजू कतली ६५० ते १५०० रूपये किलोपेढे (रू. प्रति किलो)मलाई पेढे ५००कंदी पेढे ५०० ते ६००पिस्ता पेढे ६०० ते७००केशर पेढे ७००बर्फी (रू. प्रति किलो)साधी बर्फी ५००चॉकलेट बर्फी ६००आंबा बर्फी ६००मलाई बर्फी ५४०स्पेशल बर्फी ७००गुलाब मलाई बर्फी ६००अंबामलाई बर्फी ६४०लाडू (रू. प्रति नग)राजीगिºयाचे लाडू १५ ते २०बेसन लाडू २२ नगमोतीचुर लाडू २५डिंक लाडू २४मेथी लाडू २५केशर लाडू २५काजू लाडू ३०बदाम लाडू ३०तूपातला मेवा लाडू ३०इतर स्वीट्स (रू. प्रति किलो)बाकर वडी ३५०मैसूरपाक ३४०शंकरपाळे ३४०मिक्स मिठाई ५०० ते ७००ड्रायफ्रूट मिठाई ८०० ते १२००बंगाली मिठाई आणि स्वीट्स (रू. प्रति नग)रसगुल्ला १६काचागुल्ला २२खिर कोदम २४चॉमचॉम २०मलाई चॉमचॉम २३क्रिम चॉमचॉम २८मँगो चॉमचॉम २५गुडेर ३०रसमलाई २२मोतीचूर लाडू ५७५ रूपये किलोकाजू लाडू ९२५ रूपये किलोकाजू कतली १०२५ रूपये किलोबदाम कतली ११२५ रूपये किलो

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७