मुंबई - विधिमंडळाच्या आमदारांचे दौऱ्यावेळी वर्तन कसे असावे यासाठी विधिमंडळ समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात सुनील प्रभू यांच्यासह ९ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीच्या प्रमुखपदी भाजपा आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्यांमध्ये सुनील प्रभू, सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार देशमुख, दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, अमीन पटेल, अमरिश पटेल आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश असणार आहे.
विधान मंडळ समितीच्या दौऱ्यावेळी सदस्यांचे वर्तन, आचरण कसे असावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे. त्यात उद्धवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्यासह ९ सदस्यांचा समावेश आहे. आमदारांचे वर्तन, वागणूक कशी असावी यासाठी ही समिती मार्गदर्शन करणार आहे. राज्यासह इतर राज्यात, परदेशात विधिमंडळ समित्यांचे दौरे होत असतात त्यात राज्यातील आमदार अभ्यास दौरा करून माहिती संकलन करतात. या दौऱ्यात आमदारांचे आचरण कसे असावे हे ठरवण्यासाठी समिती बनवण्यात आली आहे. या समितीत सभागृहातील वरिष्ठ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचाही समावेश आहे. ही समिती एक नियमावली तयार करेल त्यानुसार सदस्यांचे आचरण दौऱ्यात कसे असणारे हे ठरवले जाईल.
काय झाला होता वाद?
काही महिन्यांपूर्वी धुळे येथे विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर आलेली असताना या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या कथित पीएच्या शासकीय खोलीतून १ कोटी ८० लाख सापडले होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. त्यात विधिमंडळ कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. किशोर पाटील हे खोतकर यांचे पीए म्हणून धुळ्याला गेले होते. या घटनेनंतर विधिमंडळ समित्यांच्या एकूणच वर्तनाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी नीतिमूल्य समिती (एथिक्स कमिटी) स्थापन करण्यात येईल असं जाहीर करण्यात आले होते.
Web Summary : Following a controversy in Dhule, Maharashtra assembly forms committee to guide MLAs on appropriate behavior during official tours. The committee will establish guidelines, ensuring ethical conduct.
Web Summary : धुले में विवाद के बाद, महाराष्ट्र विधानसभा ने विधायकों को आधिकारिक दौरों के दौरान उचित व्यवहार पर मार्गदर्शन करने के लिए समिति बनाई। समिति आचरण संहिता स्थापित करेगी।