मनाेज जरांगे, अंजली दमानिया यांच्याविरोधात उदगीर येथे गुन्हा दाखल; अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 22:04 IST2025-01-08T22:04:09+5:302025-01-08T22:04:58+5:30
या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

मनाेज जरांगे, अंजली दमानिया यांच्याविरोधात उदगीर येथे गुन्हा दाखल; अडचणी वाढणार
राजकुमार जाेंधळे
लातूर - मनोज जरांगे-पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विराेधात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, ४ जानेवारी २०२५ रोजी परभणी येथील जाहीर सभेत मनोज जरांगे-पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या असून, यामुळे दाेन समाजात तेढ निर्माण होऊन शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची हत्या झाली ही घटना अतिशय निंदनीय आहे, हत्या करणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी. या घटनेवरुन मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांनी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
याबाबत गोविंद नरहरी घुगे (रा. लोणी ता. उदगीर) यांच्यासह सकल ओबीसी समाजाच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील, अंजली दमानिया यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.