लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर: पर्यावरणवादी कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटवरून उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांवर विठ्ठलवाडी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे हे ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत.
खानचंदानी यांचे जिया गोकलानी हिच्यासोबत आत्महत्येच्या आदल्या रात्री वाद झाले होते. जियाच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी सरिता यांच्यावर गुन्हा दाखल केला. याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या दिवशी सरिता विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गेल्या. पोलिसांसोबत चर्चा झाल्यानंतर अर्धा तासाने ऑफिसच्या समोरील इमारतीवरून उडी मारून सरिता यांनी आत्महत्या केली होती.
‘कोणत्याही नेत्याकडून रुपयाही घेतला नाही’- आत्महत्येच्या दुसऱ्या दिवसी पुरुषोत्तम यांनी त्यांच्या ऑफिसचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, सरिता या आत्महत्या करण्यापूर्वी ११:२५ वाजता एका डायरीमध्ये काही तरी लिहिताना दिसल्या. त्यांनी तपास घेतला असता, सरिता यांनी डायरीमध्ये इंग्रजीत सुसाइड नोट आढळली.
- त्यात आत्महत्येला जिया गोकलानी, उल्हास फाळके, धनंजय बोडारे, शिवानी शुक्ला, ॲड. राज चंदवानी हे जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मी काहीही चुकीचे केले नाही. मी कोणाचाही पैसा घेतला नाही.
- मी जिया गोकलानीवर कोणताही अन्याय केला नाही. कोणत्याही मंडळाकडून, कोणत्याही नेत्याकडून एक रुपयाही घेतला नाही.
- जिया गोकलानी आणि उल्हास फाळके मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत आहेत. या लोकांनी मला मानसिक त्रास दिल्याने मला माझे जीवन संपवावे लागत आहे, असा उल्लेख सुसाइड नोटमध्ये आहे.