अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 14:54 IST2018-05-01T14:54:42+5:302018-05-01T14:54:42+5:30
१ मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अनिल फकिरा वाढे (३३) हे नागपूरकडे मारुती अल्टो कार क्रमांक एम. एच. ३७ -जी ६६८२ ने डोणगाव वरुन नागपूरकुडे निघाले होते.

अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू!
मालेगाव- कार -ट्रकमध्ये झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान मालेगांव-मेहकर राज्य महामार्गावर मुंगळा फाट्याजवळ घडली. अनिल वाढे असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
१ मे या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी अनिल फकिरा वाढे (३३) हे नागपूरकडे मारुती अल्टो कार क्रमांक एम. एच. ३७ -जी ६६८२ ने डोणगाव वरुन नागपूरकुडे निघाले होते. नागपूर जिल्ह्यातील एका राष्ट्रीय शाळेवर ते कार्यरत होते. मुंगळा फाट्याजवळ ट्रक क्रमांक एम एच ३०- सी ५२५८ च्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांची कार ट्रक वर आदळून जबरदस्त अपघात झाला. या अपघातात अनिल वाढे यांचा जागीच म्रुत्यू झाला .याबाबत त्यांचा भाऊ संतोष वाढे यांनी मालेगांव पोलीसात फीर्याद दिली. पोलीसांनी ट्रक चालकावर भादवि कलम २७९, २८३, ३०४ अ नुसार गुन्ह्यांची नोंद केली.