शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कर्जमुक्ती योजनेच्या लिंकवर कॅंडी क्रश ; सहकार आयुक्त निलंबित  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 17:39 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (एमजेपीएसकेवाय) प्रसारासाठी बनविलेल्या चित्रफितीची लिंक सुरु होण्याऐवजी कँडी क्रश सुरु व्हायचे. ही बाब लक्षात येऊनही त्या बाबत योग्य दक्षता न घेतल्याने सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्यावर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे.

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या (एमजेपीएसकेवाय) प्रसारासाठी बनविलेल्या चित्रफितीची लिंक सुरु होण्याऐवजी कँडी क्रश सुरु व्हायचे. ही बाब लक्षात येऊनही त्या बाबत योग्य दक्षता न घेतल्याने सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्यावर राज्य सरकारनेनिलंबनाची कारवाई केली आहे. मोठ्या पदावरील व्यक्तीचे निलंबन करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.सोनी हे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक असून, त्यांच्यावर सहकार आयुक्तपदाचा प्रभार या पुर्वीच्या सरकारने सोपविला होता. राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रसारासाठी चित्रफित तयार करण्यात आली होती. त्याची लिंक सहकार आयुक्तांनी कृषी आयुक्तांना पाठविली. मात्र, संबंधित लिंक सुरु होण्या ऐवजी कँडीक्रश सुरु होत असल्याने, राज्य सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले. या प्रकरणी केलेल्या चौकशीत सहकार आयुक्तांवर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवून २१ जानेवारी २०२० रोजी त्यांना सेवतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या जागी मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सोनी यांनी ७ जानेवारी रोजी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची एक लिंक (युआरएल) पाठविली होती. त्यानुसार कृषी आयुक्तांनी संबंधित विषयावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्याच दिवशीच्या दुसऱ्या पत्रात मात्र अचूक लिंक पाठविण्यात आली. मात्र, सुधारीत पत्रामधे या पुर्वीच्या पत्रातील लिंक चुकीची असल्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे सरकारी योजनेची माहिती येण्या ऐवजी शेतकऱ्यांच्या  मोबाईलवर कँडीक्रश सुरु होत होते.सहकार आयुक्तांनी संबंधित कामाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. चुकीची लिंक जाऊ नये या साठी त्यांनी विशेष लक्ष देऊन काळजी घेणे अपेक्षित होते. एकाच दिवशी त्यांनी वेगवेगळी पत्रे दिली. तसेच, कृषी आयुक्तांची पोच पावती देखील घेतली. संबंधीत चूक अनवधानाने झाली नसून, हेतुपुरस्सर केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणाची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सहकार विभागाने काढलेल्या २१ जानेवारीच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. तसेच, आदेशाच्या दिवसापासून सोनी यांना निलंबित करण्यात येत असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :suspensionनिलंबनtechnologyतंत्रज्ञानUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकार