उमेदवारांचा मौखिक प्रचार सुरु!

By Admin | Updated: January 24, 2017 19:40 IST2017-01-24T19:40:43+5:302017-01-24T19:40:43+5:30

अकोला : महानगरपालिका निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले असून राजकीय पक्षही उमेदवारांच्या यादीवर अंतिम हात फिरवित आहेत.

Candidates started oral campaign! | उमेदवारांचा मौखिक प्रचार सुरु!

उमेदवारांचा मौखिक प्रचार सुरु!


अकोला : महानगरपालिका निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले असून राजकीय पक्षही उमेदवारांच्या यादीवर अंतिम हात फिरवित आहेत; पण ज्या उमेदवारांना तिकीट मिळेल अशी शाश्वती आहे, त्यांनी त्यांच्या प्रभागात मौखिक अर्थात ‘माऊथ पब्लिसिटी’ सुरु केली आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर राज्य पातळीवरील नेत्यांची अकोल्यात वर्दळ सुरु झाली आहे. अनेक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. तर अनेक उमेदवार तळ््यात-मळ््यात आहेत; पण त्यांनीही पब्लिसिटीला सुरुवात केली आहे.

Web Title: Candidates started oral campaign!