शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 12:31 IST

मॉरिशस, एनसीआय-नागपूर यांच्यात करार

मुंबई : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात सोमवारी मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानुसार मॉरिशसमधील कर्करुग्णांवरील उपचारात आता नागपूरचा सहभाग असेल. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री ॲलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.

त्यानुसार मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांवर नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचार केले जातील. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णालयांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, परिचारिकांना प्रशिक्षण दिले जाईल. या सामंजस्य कराराच्या वेळी मॉरिशसचे कौन्सिल जनरल अरविंद बख्तावार, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते. 

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर ८ कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री ॲलन गानू हे हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. तेथील अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पाहून ते भारावून गेले. त्यावेळी असा सामंजस्य करार करण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते आणि त्यातूनच आजचा दिवस साकारला.

या सामंजस्य करारानंतर मंत्री ॲलन गानू म्हणाले की, या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील. आमच्या देशात १८ वर्षांपर्यंतच्या कर्करोग रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. अलीकडेच ती वयोमर्यादा वाढवून २५ करण्यात आली आहे. या करारामुळे मॉरिशसमधील रुग्णांना सुद्धा आता चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत. हा करार फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याचा विशेष आनंद आहे. 

महाराष्ट्र-मॉरिशसच्या संबंधात नवा आयाम फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने कायमच स्वत: समृद्ध होताना जगाला मदतीचा हात देऊ केला आहे. ॲलन गानू हे तर आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत.  मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी मॉरिशसला गेलो होते. आपली मराठी परंपरा तेथे इतक्या चांगल्याप्रकारे जपली जाते, याचा मला विशेष आनंद झाला.  या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसच्या संबंधात नागपूरचा आणखी एक नवा आयाम जोडला जाणार आहे. 

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूरhospitalहॉस्पिटलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस