शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, हेच ध्येय - अमर हबीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 22:52 IST

जो कोणी शेतकरीविरोधी कायदे रद्द करायला काम करेल तो या आंदोलनात आहे असे आम्ही मानतो.

- सचिन लुंगसेशेकडो कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग), आवश्यक वस्तू कायदा १९५५ कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा अशा तीन कायद्यांनी तर शेतकरी वर्गाला लुटले आहे. आमची भूमिका एकच आहे; ती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. हे आंदोलन आहे ते किसानपुत्राच्या न्याय्य हक्कांसाठी, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.प्रश्न : किसानपुत्र आंदोलन ही संघटना आहे का, नेमके काय आहे?उत्तर : नाही. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. आमच्यात कोणीच अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. किसानपुत्र आंदोलन हे शेतकरीविरोधी कायदे संपवण्यासाठी आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. कोणतीही व्यक्ती आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आंदोलनासाठी निधी गोळा करण्याऐवजी गरजेवेळी किसानपुत्रांनी पदरमोड करून आंदोलनाच्या गरजेएवढाच खर्च करायचा; अशी आम्ही आमच्या कामाची पद्धत ठेवली आहे.प्रश्न : किसानपुत्र आंदोलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?उत्तर : उपोषण, मोर्चा, धरणे, रास्ता रोको, बंद, गर्दी गोळा करणे या गोष्टी तेवढ्या परिणामकारक राहिल्या नाहीत. परिणामी, आपणास नवे मार्ग शोधावे लागतील. लोकांची फसवणूक करून ज्यांना नेते व्हायचे आहे ते गर्दी जमवतात. आमचे काम परिवर्तनापुरते मर्यादित नाही, तर व्यवस्था हीच परिवर्तनाचे मूळ असल्याने येथे संख्येच्या तुलनेत शक्कल महत्त्वाची आहे. परिणामी, आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालेल.प्रश्न : केवळ न्यायालयीन लढाई लढता का?उत्तर : नाही. आम्ही केवळ न्यायालयीन लढाई लढत नाही तर, आमच्या पाच आघाड्या आहेत. या पाच आघाड्यांमध्ये न्यायालयीन आघाडी, संसदीय आघाडी, जनआंदोलन आघाडी, प्रचार आणि प्रसार आघाडी, राष्ट्रीय आघाडी व अन्नदात्यासाठी अन्नत्यागी उपवास केला जातो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे; त्या शेतकºयांसाठी सहवेदना व्यक्त केली जाते.आंदोलनाने काय केले?उत्तर : सुरुवातीपासून विचार करायचा झाल्यास २०१५ सालापासून आम्ही कामास लागलो. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गाच्या विरोधात कायदे असतात हेच लोक ऐकण्यास किंवा मान्य करण्यास तयार नव्हते. परिणामी, हा विषय घेत राज्यभर फिरलो. कायदेविषयक परिषदा घेतल्या. पुस्तिका काढल्या. सोशल मीडियावर प्रचार आणि प्रसार केला. याचे फलित म्हणजे मोठ्या संख्येने किसानपुत्र आंदोलनाशी जोडले गेले. त्यांनी त्यांच्या परीने आंदोलनास योगदान दिले.निवडणुकीत काय भूमिका आहे?उत्तर : आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंधित नाही. जे उमेदवार शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी भूमिका जाहीरपणे घेतील, अशा उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा नेहमीच पाठिंबा राहील.

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र