शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांचा जामीन अर्ज रद्द करा, ‘पत्राचाळ’ प्रकरणी ईडीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 06:22 IST

आज, मंगळवारीही याबाबत ईडीकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दाखल केलेला जामीन अर्ज रद्द करण्याची मागणी ईडीने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाला केली. प्रवीण राऊत हा संजय राऊत यांचा मोहरा होता. त्यांचा मदतनीस आणि त्यांचा विश्वासू होता, असे ईडीने म्हटले. आज, मंगळवारीही याबाबत ईडीकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे.

प्रवीण राऊत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. व्यतिरिक्त अन्य कंपन्यांचाही कारभार पाहायचा. त्याने संजय राऊत यांच्या  पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर ३.२७ कोटी रुपये वळते केले होते. आमच्यासमोर आणखी काही नोंदी येत असून, तपास सुरू आहे, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालयात केला. प्रवीण राऊत कंपनीच्या कामात सक्रिय होते आणि संजय राऊतही त्यांना मदत करत होते. पत्राचाळीच्या पुनर्विकासात संजय राऊत यांचा सक्रिय सहभाग होता. ईडीने नोंदविलेल्या जबाबांवरून असे समोर आले आहे की, संजय राऊत यांना सदनिका खरेदी करण्यामध्ये स्वारस्य होते. काही लोकांनी एकत्रितपणे १३ लाख रुपये वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात जमा केले. कारण त्यांना संजय राऊतांना नाखूश करायचे नव्हते, असा युक्तिवाद सिंग यांनी न्यायालयात केला. 

भाजपला हरण्याची भीती म्हणून माघार : संजय राऊतअंधेरी विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केले. निवडणूक हरणार असल्याचे भाजपला माहीत होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ४५ हजार मतांनी निवडणूक हरत असल्याचे समोर आले म्हणून त्यांनी माघार घेतली, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र स्क्रिप्टेड असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय