शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

धनगर आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा : धनगर समाजाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 20:05 IST

धनगड या इंग्रजी शब्दामुळे रखडले गेले असून सरकारने तातडीने धनगरांना आरक्षण जाहीर करावे.

ठळक मुद्दे 12 ते 19 डिसेंबर कालावधीत राज्यभरातील धनगर समाज घरांवर काळे झेंडे लावून निषेध करणार 

पुणे : धनगर समाजाला आरक्षण देण्याकरिता स्वतंत्र समिती किंवा तरतूद करण्याची गरज नाही. मध्यप्रदेश आणि बिहार राज्याने ज्यापध्दतीने चार ओळींचे परिपत्रक प्रसिध्द केले आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील धनगर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी पावले उचलावीत. घटनेत दिलेले आरक्षण केवळ धनगड या इंग्रजी शब्दामुळे रखडले गेले असून सरकारने तातडीने धनगरांना आरक्षण जाहीर करावे. अन्यथा सरकारला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला.  धनगर समाजाच्या आरक्षण प्रकरणी सरकार चालढकल करत असून  12 ते 19 डिसेंबर कालावधीत राज्यभरातील धनगर समाज घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करणार आहे. सरकार आरक्षण देण्याबाबत गंभीर नाही. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गातून (एसटी) आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी. अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यात जवळपास दोन कोटीच्या संख्येने धनगर समाज असून 16 लोकसभा निवडणूका होईपर्यंत या समाजाला राजकीय नेतृत्व देखील मिळाले नाही. यापूर्वीच्या सत्ताधारी पक्षांनी देखील आश्वासने देऊन धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. गेल्या चार महिन्यापासून आरक्षण मिळावे याकरिता सरकारवर दबाव टाकून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. सरकारने मराठा आणि धनगर आरक्षणाविषयी कुठलेही धोरणात्मक निर्णय घेत नसल्याची टीका पडळकर यांनी केली.  विशेष कँबिनेट किंवा समितीची गरज धनगर आरक्षणाकरिता नसून मुख्यसचिवाने परिपत्रक काढल्यास पुढील कार्यवाही होऊ शकते असे संघटनेने म्हटले आहे. उत्तमराव जाणकर म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण दिल्याने 34 मतदार संघ आरक्षित होणार आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतदार संघ येतात. बीड, परभणी, सांगली, नांदेड, बारामती या भागात सर्वाधिक प्रमाणात धनगर समाज आहे. आदिवासी आणि धनगर यांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसून त्यांच्यात केवळ राजकीय संघर्षाकरिता वेगळे चित्र उभे केले जात आहे. टाटा इन्स्ट्यिुटच्यावतीने करण्यात आलेले संशोधन हे संविधानिक स्वरुपाचे नाही. त्यांच्या संशोधनावरुन आरक्षण द्यायचे किंवा नाही हे ठरवु नये. 

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षणGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस