शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 20:09 IST

Uddhav Thackeray :  "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्‍याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात व्यस्त आहेत. अशातच, भविष्यात मनसेसोबत युती होऊ शकते का? यासंदर्भात शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. "हे बोलणे अत्यंत क्लेशकारक आहे. पण माझे नाते माझ्या महाराष्ट्रासोबत आहे. तो लुटला जातोय, हे मी उघड्या डोळ्याने बघू शकत नाही आणि त्या लुटारूंना मदत करणार्‍यांना मी मदत करणे म्हणजे, मी महाराष्ट्रासोबत विश्वासघात करतोय. महाराष्ट्राशी विश्वासघात करणाऱ्यासोबत मी युती करूच शकत नाही," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते एबीपी माझासोबत बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत जसे सांगितले, की महाराष्ट्राचे लुटारू नकोत. त्यांनी तर जाहीर केले आहे की कोण मुख्यमंत्री व्हायला हवा. मग जर तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्याला त्यांचा पाठिंबा असेल, तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही. मी माझ्या महाराष्ट्राशी बांधिल आहे."

"माझ्या वडिलांनी, हिंदू हृदय सम्राटांनी, शिवसेनेची स्थापना महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसाच्या न्यायासाठी केली. ती महाराष्ट्राच्या लुटारूंना सत्तेवर बसवण्यासाठी नाही केली. त्यामुळे, मी ज्या पद्धतीने माझे धोरण स्पष्ट केले आहे, त्याप्रमाणे, त्यांनीही त्यांचे धोरण स्पष्ट करावे. आतसेच, त्यांनी सर्वात पहिले त्यांच्या पक्षाचे नाव काय आहे, 'मनसे' आहे की 'गुणसे'? हेही ठरवावे," असेही ठाकरे म्हणाले.

एवढेच नाही तर, "कृपाकरून तुम्ही नात्याची गफलत करू नका, माझे नाते नाते महाराष्ट्राच्या जनतेशी आहे आणि त्या जनतेशी द्रोह करणार्‍याला मी पाठिंबा देऊ शकत नाही," असेही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना