शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक आधी घेता येईल? राज्य निवडणूक आयोग करतोय चाचपणी

By दीपक भातुसे | Updated: November 29, 2025 05:55 IST

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर गेली आहे

दीपक भातुसे 

मुंबई - राज्यातील केवळ दोनच महापालिकांनी ५० टक्के राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणूक आधी घेता येणे सोपे जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. 

राज्यात केवळ नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्यामुळे त्यात दुरुस्ती करून ही मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आणणे सोपे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी त्याबाबत अधिक मोठी कार्यवाही करावी लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता

राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्यावर गेली आहे. मात्र महापालिकांच्या निवडणुकीत न्यायालयाने कोणतीच आडकाठी न टाकल्याने महापालिकाचा निवडणूक कार्यक्रम डिसेंबरमध्ये जाहीर केला जाईल, असे निवडणूक आयोगीतील सूत्रांनी 'लोकमत'ला सांगितले.

महायुती सरकार आणि भाजप ओबीसीविरोधी : काँग्रेस

विरोधकांनी महायुती सरकारवर टीका करत सरकार ओबीसीविरोधी असल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने ५० टक्क्यांची मर्यादा स्पष्ट केली आहे, म्हणजे अनेक ठिकाणी विद्यमान ओबीसी आरक्षण कमी करावे लागणार. यामुळे भाजपचे दुहेरी धोरण उघड झाले आहे, अशी टीका काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे की, न्यायालयाचा संपूर्ण निकाल अभ्यासल्यानंतरच शासनाची अधिकृत भूमिका जाहीर करू. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही पूर्ण सन्मान करतो.

English
हिंदी सारांश
Web Title : State Election Commission exploring possibility of early municipal elections.

Web Summary : The State Election Commission is exploring early municipal elections, as only Nagpur and Chandrapur corporations exceed the 50% reservation limit. Amending this is easier than for Zilla Parishads. The election program is likely to be announced in December. Opposition criticizes the government as anti-OBC.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024MahayutiमहायुतीOBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक