व्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणे शक्य!

By Admin | Updated: November 3, 2014 04:31 IST2014-11-03T04:31:43+5:302014-11-03T04:31:43+5:30

व्यंग अर्भकाचे पोषण करणे हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दिव्य ठरते. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचे कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही.

Can be prevented with the birth of an infant baby! | व्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणे शक्य!

व्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणे शक्य!

मुंबई : व्यंग अर्भकाचे पोषण करणे हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दिव्य ठरते. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचे कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळाने बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.
व्यंग अर्भक जन्माला येण्याचे प्रमाण जगात ३ टक्के आहे. आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे. व्यंगासह जन्माला येणाऱ्या अर्भकाला आयुष्यभर होणारा त्रास हा त्या कुटुंबासह सामाजिकदृृष्ट्यादेखील चिंतेचाच विषय असतो. यावर तोडगा म्हणजे गर्भातील अर्भकाची शारीरिक रचना जाणून घेतल्यानंतर ते कुटुंब पुढील निर्णय घेऊ शकते. त्यातही एखाद्या कुटुंबाने गर्भपाताचा निर्णय घेतल्यास त्याला कायद्याने घालून दिलेली २० आठवड्यांची मुदत आडवी येते. त्यामुळे त्या कुटुंबाला गर्भपात करता येत नाही. पर्यायाने व्यंग अर्भक जन्माला येण्याची शक्यता बळावते. पुढे त्या अर्भकासह त्याच्या कुटुंबालाही समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत २० आठवड्यांची मर्यादा वाढवणे आवश्यकच होते. केंद्राने या कायद्यात बदल करण्याचे प्रस्तावित केले असून, मर्यादा २४ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे.
सध्या १९७१च्या गर्भपात प्रतिबंधक कायद्यानुसार, व्यंग किंवा जिवाला धोका असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्यासाठी २० आठवड्यांपर्यंतची मुदत आहे. मात्र २० आठवड्यांपर्यंत गर्भाची वाढ परिपूर्ण झालेली नसते. २० आठवड्यांपर्यंत गर्भाचे हृदय, मेंदू या अवयवांची वाढ ही प्राथमिक स्वरूपाची झालेली असते. २० आठवड्यांपासून २४ आठवड्यांपर्यंत गर्भाची जी वाढ होते, त्यात प्रामुख्याने हृदय आणि मेंदूमध्ये व्यंग असल्यास त्याचे निदान करता येते. या काळात गर्भाचा आकार वाढतो, त्यामुळेही त्याच्या तपासण्या करून व्यंग शोधण्यास सोपे जाते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. यामुळेच गर्भपाताची मुदत २० आठवड्यांऐवजी २४ आठवडे केल्यास त्याचा फायदा होणार असल्यामुळे डॉक्टरांकडून या बदलाचे स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Can be prevented with the birth of an infant baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.