शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election2019: कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काँग्रेस उभारणे अशक्य : असदुद्दीन ओवेसी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:30 IST

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे 

ठळक मुद्देसक्षम विरोधकाची गरज काँग्रेसचा कप्तानच लोकसभा निवडणुकीनंतर पळून गेला अशी टीका

पुणे : काँग्रेसला मत दिले म्हणून बदल घडेल, अशी आशा आता सोडून दिली पाहिजे़. काँग्रेस रसातळाला गेली असून, कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी आजमितीला काँग्रेस पुन्हा उभी राहणे अशक्यच आहे़, अशा शब्दांत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केले़. दरम्यान भाजपाचा कारभार पाहता देशाची वाटचाल आता हुकुमशाहीकडे चालली असल्याने सक्षम विरोधकाची गरज निर्माण झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़. एमआयएमतर्फे आयोजित निवडणुक प्रचार सभेत ओवेसी बोलत होते़. यावेळी खासदार इम्तियाज जलील, उमेदवार जाहिद शेख, डॅनियल लांडगे, हिना मोमीन  आदी पदाधिकारी उपस्थित होते़. जहाज बुडताना कप्तान इतरांना प्रथम वाचवितो़. मात्र, काँग्रेसचा कप्तानच लोकसभा निवडणुकीनंतर पळून गेला अशी टीका करून ओवेसी यांनी, महाराष्ट्रातील राजकारणात आता विरोधी पक्ष राहिलेला नसल्याचे सांगितले़. जो पैसे खर्च करून निवडून येत आहेत. तो केवळ पैसे कमविणे हेच उद्दिष्ट ठेवत आहे़. भाजप सरकारची वाटचाल ही हुकुमशाहीकडे चालली असून, धर्मांतर करण्याकरिता हिमाचलमध्ये कायदा करून त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे़. दहशतवाद संपविण्याच्या नावाखाली सत्तेत आल्यापासून भाजपने केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट केले आहे़. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी शहिद झालेल्या मुंबई पोलिस दलातील हेमंत करकरे यांच्यावर टीका करणाºयांना भाजपने उमेदवारी देऊन निवडून आणले आहे.  आपल्या समाजाचा, आपल्या मतावर, आपला माणूस विधानसभेवर निवडून जावा़. तसेच सर्वसामान्यांना वंचितांना न्याय देण्याकरिता विरोधकांची जागा भरून काढण्याचा प्रयत्न एमआयएम करीत आहे़. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळते. पण अल्पसंख्याक समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेले नाही़. धर्मनिरपेक्षततेची गोष्ट करणाऱ्यांनी तरजेबला मारले़. आजही मुस्लिम व्यक्तींना कारागृहात वर्षोनुवर्षे मुद्दाम डांबून ठेवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़. 

टॅग्स :PuneपुणेAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणElectionनिवडणूकMuslimमुस्लीम