शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

टोलमधील गैरव्यवहाराचे ‘कॅग’ने फोडले होते बिंग

By admin | Updated: October 7, 2015 01:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावरील राज्यातील ५२ प्रकल्पांतील करारांवर महालेखा परीक्षकांनी २००१ सालीच गंभीर आक्षेप घेतले होते़ कंत्राटदारांना कोट्यवधींचा फायदा होत असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले होते़राज्यातील महालेखा परीक्षकांनी १९९६ ते २००१ दरम्यान ३२ रस्ते आणि २० पुलांची कामे बीओटीनुसार खासगी कंत्राटदारांना विकसित करण्याची परवानगी पीडब्ल्यूडीला दिली होती. त्यावर टोलआकारणी करण्याचीही मुभा देण्यात आली होती. कंत्राटदारांबरोबर झालेल्या कराराचे परीक्षण करताना कॅगने अनेक गंभीर आक्षेप नोंदविले होते़ त्यात दाखविण्यात आलेला वाहतुकीचे प्रमाण, दरवर्षी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि गुंतवणुकीवर देण्यात येणारे जादा व्याज हे न पटणारे आणि या रस्त्यांचा वापर करणाऱ्यांवर जादा भार टाकणारे असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते़ २१ प्रकल्पांत पाच महिन्यांपासून ९ वर्षांचा कालावधी जास्त देण्यात आला आहे़ त्यामुळे कंत्राटदारांना ५३३़७१ कोटी रुपये जादा टोल मिळणार आहे़ वाहनसंख्या आणि विभागाकडे असलेल्या माहितीची पडताळणी न केल्याने कंत्राटदारांना ९०़१२ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ वाहनांची संख्या अतिशय कमी दाखविल्याने कंत्राटदारांना ४५़१८ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे़ समिती स्थापन करण्याची मागणीमाहिती आयुक्तांच्या दणक्यामुळे पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसी यांनी ही कागदपत्रे व करार उघड केले आहेत़ त्यातील आकडेवारीमधील विसंगती लक्षात घेता, त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे़ टोलचा हा झोल संपविण्यासाठी शासनाने तातडीने एक समिती स्थापन करावी़ त्यात कंत्राटदारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, वाहतूकदार संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे़