शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Government : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 10:56 IST

Maharashtra Winter Session 2019 : आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे.

नागपूर : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा केले आहे. तसेच, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. 

आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मीडियासोबत बोलताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून लवकरच नववर्षाच्या आधी होईल, असे सांगितले. यावेळी अजित पवार यांना नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून तुमची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला असता यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणास नकार दिला. मात्र, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याबद्दल सुद्धा कोणतीही दिली नाही.

याशिवाय, शेतकरी कर्जमाफीची आज घोषणा होणार नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, 'आज काहीही होऊ शकते. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार की नाही, हे माहीत नाही. पण माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांबाबत ते सकारात्मक निर्णय घेऊ शकतात.' त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे संकेत आहेत. 

देशात ठिकठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना अजित पवार यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करायचा असेल तर शांतेच्या मार्गाने करावा, असे आवाहन करत लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. याशिवाय, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून कोणीही राजकरण करू नये, असेही अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार