शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; तीन दिवसांत शपथविधी? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 06:41 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला गती येणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत विस्ताराला मुहूर्त लागेल, अशी शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनला शपथ घेतली होती. त्यानंतर ३३ दिवस उलटले तरी विस्तार झालेला नाही. गेल्या महिनाभरात वीसेक मुहूर्त सांगितले गेले. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाच दिल्ली वाऱ्याही झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे.

सर्वोच्च न्यायालयातील १ ऑगस्टच्या सुनावणीनंतर विस्तार केला जाईल, असे म्हटले जात होते. ही सुनावणी आता ३ ऑगस्टला होत आहे. सुनावणीत शिंदे सरकारला दिलासा मिळाला तर विस्ताराच्या हालचाली गतिमान होतील. भाजपच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले, की काही जणांना मुंबईतच थांबायला सांगितले आहे.राज्य मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ४२ आहे; पण पहिल्या टप्प्यात भाजपच्या आठ आणि शिंदे गटाच्या पाच आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी विस्ताराने चर्चा झाली. भाजप व शिंदे गटात मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युलादेखील ठरला, तरी विस्ताराचा पत्ता नाही, अशी स्थिती आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेच विधिमंडळाचे छोटेखानी पावसाळी अधिवेशन घेतले जाईल व ऑगस्टअखेर दुसऱ्या टप्प्याचा विस्तार केला जाईल, असे मानले जाते. परंतु विरोधक मात्र यावर समाधानी नाहीत. त्यांनी यावरून सरकारला घेरणे सुरुच ठेवले आहे. 

दिल्लीतून सिग्नल नाही, की मंत्री ठरवता येत नाहीत : अजित पवार  राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी दिल्लीहून सिग्नल मिळत नाही की इच्छुक आमदारांची संख्या अधिक असल्याने अडचण आहे? किती दिवस दोघांचे मंत्रिमंडळ चालविणार, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्र परिषदेत केला.ते म्हणाले की, महिना उलटला तरी विस्तार होत नाही. मंत्रिमंडळ बैठक आहे. दोघेच मंत्रिमंडळ बैठक घेणार. उरलेल्या ४० खुर्च्या त्यांच्याकडे बघत बसणार.  मुख्यमंत्र्यांकडे सर्व खात्याचे अधिकार आहेत. उपमुख्यमंत्र्यांना खातेच दिलेले नाही.  प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. मात्र, सहीअभावी फाइली थांबल्या आहेत. सह्या करायला मुख्यमंत्र्यांना वेळच नाही. उपमुख्यमंत्र्यांना अधिकारच दिलेला नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालय