शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
3
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
4
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
5
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
6
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
7
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
8
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
9
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
10
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
11
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
12
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
13
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
14
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
15
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
16
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
17
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
19
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
20
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."

मंत्रिमंडळ विस्तार कधी हे मुख्यमंत्र्यांच्या हाती - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 3:12 PM

मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी कायम ठेवला. 

भातसानगर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरवतील, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी त्या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबतचा सस्पेन्सही त्यांनी कायम ठेवला. 

दशरथ तिवरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी आमदार दौलत दरोडा यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. दरोडा यांच्याशी बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा केली. नंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, लवकरच शहापूर तालुक्यातील चोंढे, घाटघर, नगर या मार्गावरील रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.या रस्त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. उपमुख्यमंत्र्यांसमवेत राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव, ठाणे शहर अध्यक्ष नजीब मुल्ला, किसन तारमळे, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे, शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे, युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, भाऊ दरोडा, करन दरोडा आदी पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार