शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:02 IST

'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे.'

मुंबई: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. भाजपच्या 9 आणि शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावर विरोधी विविध प्रतिक्रिया येत आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारला टोला लगावला आहे.

'राज्यातील जनता बेजार झाली होती'माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, 'सरकार स्थापन होऊन एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, पण आता मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. चाळीस दिवसांपासून राज्यातील जनता बेजार झाली होती. राज्यात सरकार माय बाप नाही अशी भावना होती. आता तरी सरकारने शासकीय यंत्रणा कार्यरत करावी', असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

'आम्ही कुणालाही क्लिनचीट दिली नाही'ते पुढे म्हणाले की, 'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. त्यांनी आता निर्णय घेतला आहे. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे. संजय राठोड यांच्या विरोधात भाजपनेच आंदोलन केले, पण आता त्यांनीच राठोड यांना सरकारमध्ये घेतले आहे. आम्ही महाविकास आघाडी काळात कुणालाही क्लिनचीट दिली नाही. आम्ही अशी घाई केली नाही, असा खुलासाही जयंत पाटलांनी केला.

'संजय राठोडांना मंत्री केल्याचा मनापासून आनंद'दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आनंद व्यक्त केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'संजय राठोड महाविकास आघाडीत मंत्री असताना आम्ही सातत्याने सांगत होतो की, त्यांच्यावर अन्याय होतोय. मात्र, भाजपने कोणतेही भान न ठेवता राळ उठवली होती. बेछूट आरोप केले होते. मात्र, त्या आरोपांचे नंतर काय झाले, असा सवाल उपस्थित करत आता संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याचा मला मनापासून आनंद होत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा