शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 00:40 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भात स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत, आठ आमदारांसह राज्यातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा देत मंत्री पदाची शपथ घेतली. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची खास मुलाखत घेतली. यावेळी तटकरे यांनी अनेक प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिली. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भातही त्यांनी भाष्य केले. 

राष्ट्रवादीतील या फुटीनंतर, अजित पवारांनी शक्तीप्रदर्शन करत, "मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. माझ्या मनात महाराष्ट्राच्या सार्वांगिन विकासासंदर्भात काही कल्पना आहेत. त्या मी मुख्यमंत्री झालो, तर चांगल्या पद्धतीने राबवू शकेन," असे आपल्या भाषणातून म्हटले होते. यावरून, भाजपसोबत जाऊन आणि शिंदेंची शिवसेना सोबत घेऊन, अजित पवारांना भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी आहे का? असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला. यावर तटकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. 

राज्यात दादा मुख्यमंत्री व्हायवेत अशी लोकांची इच्छा -तटकरे म्हणाले, "राजकारणात कधीही कशाही पद्धतीचे प्रसंग निर्माण होत असतात. एक खरे आहे की, आता आम्ही भाजप- शिवसेनेसोबत (एकनाथ शिंदे) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही आम्ही एत्रितपणे लढणार आहोत. दादांच्या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत, राज्यात दादा मुख्यमंत्री व्हायवेत अशी लोकांची इच्छा आहे. मात्र, आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्हता लक्षात घेता, जेव्हा केव्हा शक्य होईल, तेव्हा ती संधी त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे येऊ शकते." अजित दादा हे 1999 पासून ते संघटनेत दुय्यम पद्धतीचे नेतृत्व करत होते. मात्र 2004 नंतर दादांचे स्थान राज्य पातळीवरील नेता म्हणून निर्माण झाल्यापासून, त्यांची प्रचंड मेहनत, लोकांचे प्रश्न सोडविण्याची आणि प्रशासनावरील त्यांची विलक्षण हातोटी आणि दिवसातील 17-18 तास काम करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. येथे एक गोष्ट सांगायला मला निश्चितपणे आनंद होईल की, महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आपले स्थान पहिल्या क्रमांकाचे करण्यात त्यांची मेहनत त्यांचे कष्ट निश्चितपणे उपयुक्त ठरतात, असेही तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.

बघा सविस्तर मुलाखत - 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण