दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून १६ हजारांची औषध खरेदी
By Admin | Updated: January 16, 2017 05:33 IST2017-01-16T05:33:58+5:302017-01-16T05:33:58+5:30
बँक अधिकाऱ्याच्या नावे फोन करून ठाण्यातील एका रहिवाशाच्या क्रेडिट कार्डमधून औषधखरेदी केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
_ns.jpg)
दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून १६ हजारांची औषध खरेदी
ठाणे : बँक अधिकाऱ्याच्या नावे फोन करून ठाण्यातील एका रहिवाशाच्या क्रेडिट कार्डमधून औषधखरेदी केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ठाण्यातील चरई परिसरात राहणारे चंपालाल सरोदे (५८) यांना २४ सप्टेंबर २०१६ रोजी अज्ञात आरोपीने बँकेचे नाव सांगून फोन केला. त्यांच्या क्रेडिट कार्डचा तपशील मागितला. सरोदे यांनी विश्वास बसल्याने संपूर्ण तपशील दिला. त्यानंतर, त्यांच्या क्रेडिट कार्डमधून जिग्नासा असोसिएशनच्या नावे ९१५० रुपयांची, तर नॅचरल शॉपिंगच्या नावे ७३०१ रुपयांची औषधखरेदी करण्यात आली. सरोदे यांनी याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याबाबत चौकशी करून १४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.