शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘आता मात्र सर्वांसमोर…’, वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:37 IST

Sushil Karad News: वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आज समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट केली आहे. तसेच सुशील कराडच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. दरम्यान, वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयात दणका बसल्यानंतर आज वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आज समाजमाध्यमांवर सूचक पोस्ट केली आहे. तसेच सुशील कराडच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

सुशील कराडने फेसबूकवर ही पोस्ट लिहिली असून, त्यात त्याने ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार’, असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आता सुशील कराड नेमकं काय बोलणार आणि काय गौप्यस्फोट करणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुशील  कराड हा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याचा मुलगा आहे. संतोष देखमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडने यापूर्वी बीड जिल्हा न्यायालय आणि  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन तसेच दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता, दोन्ही न्यायालयांनी त्याचे अर्ज फेटाळले होते. त्यानंतर वाल्मिक कराडने सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, पण तिथेही त्याला दिलासा मिळाला नव्हता.

संतोष देशमुख यांचा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला होता. हा खून खंडणी प्रकरणातून झाल्याचा दावा देशमुख कुटुंबीयांनी सुरुवातीपासून करत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीला पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चे आणि आंदोलनांनंतर तपासाला गती मिळाली आणि अखेर आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का (MCOCA) लावण्यात आला आहे. आरोपी स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत असले, तरी सरकारी पक्षाने तो फेटाळला आहे. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी