व्यवसाय परवाने आता ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 02:18 IST2016-11-04T02:18:02+5:302016-11-04T02:18:02+5:30

महापालिका प्रशासनाने व्यवसाय परवान्यांसह इतर आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आता आॅनलाइन केल्या आहेत.

Business license now online | व्यवसाय परवाने आता ऑनलाइन

व्यवसाय परवाने आता ऑनलाइन


नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने व्यवसाय परवान्यांसह इतर आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या आता आॅनलाइन केल्या आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारच्या परवान्यासाठी नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या खेटा माराव्या लागणार नाहीत. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे व्यवसाय परवाने आॅनलाइन देणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ई-गव्हर्नन्सवर भर दिला आहे. त्यानुसार महापालिकेचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. व्यवसाय परवान्यासह जन्म-मृत्यूचा दाखला, विवाह नोंदणी, बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र आदी १६ नागरी सेवा आॅनलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच विविध परवानग्यांना लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करून ती बारावरून पाच इतकी केली आहे. तर परवाने मिळण्याची मुदत ४५ दिवसांवरून १७ दिवसांपर्यंत आणण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Business license now online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.