आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

By Admin | Updated: March 1, 2016 19:36 IST2016-03-01T19:24:42+5:302016-03-01T19:36:24+5:30

अमरावतीहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या प्रवासी बसने रस्त्यात अचानक पेट घेतला. मगंळवारी ही घटना घडली.

Bus burning in the fire, 50 passengers escaped | आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

आगीमध्ये बस जळून खाक, ५० प्रवासी बचावले

ऑनलाइन लोकमत 

बडनेरा, दि. १ - अमरावतीहून नागपूरच्या दिशेने निघालेल्या प्रवासी बसने रस्त्यात अचानक पेट घेतला. मगंळवारी ही घटना घडली. ५० प्रवाशांना घेऊन ही बस नागपूरला चालली होती.
 
अचानक बसच्या इंजिन मध्ये आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने लगेचच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला. ही संपूर्ण बस आगीमध्ये जळून खाक झाली. 
 
 
 
 
 
 

Web Title: Bus burning in the fire, 50 passengers escaped