घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

By Admin | Updated: September 10, 2016 05:01 IST2016-09-10T05:01:01+5:302016-09-10T05:01:01+5:30

रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या.

Burglar interstate gang expose | घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

घरफोड्यांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश


मुंबई : रात्रीच्या वेळी दुकानांमध्ये घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना पार्कसाईट पोलिसांनी गुरुवारी रात्री बेड्या ठोकल्या. अर्जुनसिंग राजपूत (२४), मोहनसिंग राजपूत (२६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, न्यायालयाने आरोपींना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांचा साथीदार रुपेश सिंग आणि धर्मेशकुमार पटेल यांचा राजस्थान आणि गुजरातमध्ये शोध सुरू असल्याचे पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>राजस्थान आणि गुजरात राज्यातून आलेल्या लुटारूंची एक टोळी रात्रीच्या वेळी गाड्यांचा वापर करून घरफोड्या करीत आहे. या टोळीने मुख्यत्वेकरून मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांना लक्ष्य केल्याची माहिती विक्रोळीच्या पार्कसाईट पोलिसांना मिळाली होती. याचा तपास करीत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आर. डी. जाधव यांनी सापळा रचून राजपूत बंधूंना
पकडले. त्यांच्या जवळून घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Web Title: Burglar interstate gang expose