शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गिरणी कामगारांच्या घरांचा भार सरकारी तिजोरीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 7:16 AM

या रकमेची प्रतिपूर्ती सरकारने करावी, अशी मागणी म्हाडाकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी निश्चित केलेली १८ लाख रुपयांची किंमत मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ९.५० लाख रुपये करण्यात आली. मात्र, त्यामुळे म्हाडाला सुमारे ३३१ कोटी रुपयांची तूट सोसावी लागेल, असे सांगितलेजात आहे. या रकमेची प्रतिपूर्ती सरकारने करावी, अशी मागणी म्हाडाकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी बॉम्बे डार्इंग, स्प्रींग मिल, श्रीनिवास मिलच्या जागेवर बांधलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची सोडत रविवारी काढण्यात आली. या घरांच्या उभारणीसाठी आलेलाएकूण खर्च विचारात घेत म्हाडाने या घरांची किंमत प्रत्येकी १८ लाख रुपये निश्चित केली होती. मात्र, गिरणी कामागारांनी त्यास तीव्र विरोध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तक्षेपानंतर घरांची किंमत साडे नऊ लाख रुपयेच असेल, असेजाहीर करण्यात आले.गिरणी कामगारांना १८ लाख रुपये किमतीत घर देताना म्हाडाला आर्थिक लाभ होणार नव्हता. मात्र, घरांच्या किमती कमी केल्यामुळे प्रत्येकी साडे आठ लाख रुपयांची तूट येणार आहे. एकूण तूट ३३१ कोटीपर्यंत जाणारी आहे. शासनाकडून प्रतिपूर्ती मागण्यांचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मांडले. मात्र, तूर्त त्याबाबत निर्णय झालेला नाही. वरिष्ठांशी चर्चा करून आणि सविस्तर ताळेबंद मांडून पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. क्रॉस सबसिडीचा पर्याय म्हाडाच्या माध्यमातून उच्च उत्पन्न गटांसाठी जी घरे उभारली जातात त्या घरांच्या किमतींत वाढ करून (क्रॉस सबसिडी) ही तूट भरून काढता येईल. त्याशिवाय रेंटल हाउसिंगची घरे विकासकांकडून एमएमआरडीएला विनामूल्य मिळालेली आहेत. ती गिरणी कामगारांना देताना जे पैसे मिळतील त्यातून ही तूट भरून काढण्याची विनंती सरकारला करता येईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे>गिरणी कामगारांचा अधिकारमुंबई शहरावर गिरणी कामगारांचा अधिकार आहे. देशाच्या कानाकोपºयातून मुंबईत आलेल्या व बेकायदा झोपड्यांमध्ये वास्तव्य करणाºया अनेकांना एसआरए योजनेतून फुकटात घरे मिळतात. मग, गिरणी कामगारांसाठी सवलतीच्या दरात व सरकारी तिजोरीतून थोडे पैसे खर्च करून घर देण्यास काय हरकत आहे, असा सवालही म्हाडाच्या अधिकाºयाने उपस्थित केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे