शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

मालवणात सापडली बंपर तारली, समुद्राच्या लाटांसोबत किनारी : पर्यटकांसह, स्थानिकांची पाहण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2017 15:24 IST

कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले.

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर चार दिवसांपूर्वी ओखी वादळाने मच्छीमारांच्या नाकी दम आणले होते. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कोट्यवधी रूपयांचे नुकसान केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे वादळ शांत झाले. त्यामुळे मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला. रविवारी मच्छीमारांनी पुन्हा नव्या उमेदीने मच्छीमारीस प्रारंभ केला.  त्याचदरम्यान, सकाळी मालवण किनारपट्टीवर तारली मासळी बंपर स्वरूपात आढळून आली. मोठ्या प्रमाणात तारली मासळी किनाऱ्यालगत लाटांसोबत येत असल्याने तिला पाहण्यासाठी आणि पकडण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी केली होती.पर्यटकांसाठी मांदियाळी-मालवणसह संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत. हिवाळी हंगामात सिंधुदुर्ग पर्यटनासाठी महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची किनारपट्टी आहे. त्यामुळे मालवण, आचरा, कुणकेश्वर, भोगवे, निवती, वेंगुर्ले, शिरोडा, आरोंदा आदी महत्वाच्या बिचवर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. त्यातच सिंधुदुर्ग किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहे.स्थानिक मालवणी भोजनाचा आस्वाद घेतानाच रविवारी  मालवणात प्रत्यक्षात मासळी पकडण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांसाठी ही एक सुवर्ण संधीच ठरली.बंपर तारली हा ओखीचा परिणाम-ओखीच्या परिणामाने समुद्राच्या हालचाली बदलल्या त्यातूनच तारली सारखी मासळी किनाऱ्यावर येत असल्याचा अंदाज ज्येष्ठ मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला.शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींची लगबग-सिंधुदुर्ग किल्ला, कुणकेश्वर मंदिर, नयनरम्य भोगवे बिच आदी ठिकाणांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र, विर्दभ, मराठवाड्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे दाखल होत आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठी गर्दी होत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार