दामदुपटीचे आमिष; ४४ लाखांचा गंडा

By Admin | Updated: November 12, 2015 03:07 IST2015-11-12T03:07:43+5:302015-11-12T03:07:43+5:30

गुंतवणूक योजनेत दोन वर्षांत पैसे दामदुप्पट होण्याचे आमिष दाखवित मित्राचीच ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना

Bump of bump; 44 lakhs | दामदुपटीचे आमिष; ४४ लाखांचा गंडा

दामदुपटीचे आमिष; ४४ लाखांचा गंडा

कोल्हापूर : गुंतवणूक योजनेत दोन वर्षांत पैसे दामदुप्पट होण्याचे आमिष दाखवित मित्राचीच ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी मंगळवारी पेडणेकर दाम्पत्यासह तिघांना अटक
केली.
संशयित आरोपी अमोल मनोहर पेडणेकर (३०), त्याची पत्नी विजया (२३), नातेवाईक संजय अरविंद वेसणेकर (४९, सर्व रा. फायर स्टेशननजीक, फुलेवाडी) यांना न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयित आशिष मनोहर पेडणेकर जर्मनीमध्ये असून, त्याला अद्याप अटक केलेली नाही. अभय प्रभाकर जाधव यांनी फिर्याद दिली आहे. अभय जाधव बांधकाम क्षेत्रात नोकरीस आहेत. अमोल त्यांचा मित्र आहे. अमोलने माझा भाऊ आशिष जर्मनीत नोकरी करतो, असे सांगून जाधव यांच्याकडून परदेशी ट्रेनिंग शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. चौघा संशयितांनी संगनमत करून जाधव यांच्याकडून तीन वर्षांत दुप्पट पैशांचे आमिष दाखवून धनादेश व रोखीने सुमारे ४३ लाख ७८ हजार रुपये घेतले. दोन वर्षांनंतर जाधव यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केली. (प्रतिनिधी)

Web Title: Bump of bump; 44 lakhs