सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझर लावला

By Admin | Updated: November 8, 2015 00:15 IST2015-11-08T00:15:27+5:302015-11-08T00:15:27+5:30

ज्या बनावट संस्थांच्या आधारे सहकारातील राजकारण केले जाते, त्या बंद करून नवीन संस्था उभारण्यासाठी बळ देऊ, असे सांगत सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझरच लावला आहे, असे

Bulldozers for co-operative profanity | सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझर लावला

सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझर लावला

कोल्हापूर : ज्या बनावट संस्थांच्या आधारे सहकारातील राजकारण केले जाते, त्या बंद करून नवीन संस्था उभारण्यासाठी बळ देऊ, असे सांगत सहकारातील अपप्रवृत्तींसाठी बुलडोझरच लावला आहे, असे कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवरील कारवाई ही अटळच आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यातील नागपूर, बुलढाणा, वर्धा, उस्मानाबाद या जिल्हा बँकांना कुलूप लागण्याची शक्यता असताना येथील संचालकांवर कारवाई करण्याऐवजी शासनाने २०० ते ३०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. तर कोल्हापूर जिल्हा बँक सक्षम असताना सहकारमंत्री पाटील यांनी केवळ सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप माजी आमदार पी. एन. पाटील यांनी केला होता. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेवरील कारवाईत कोणताही भेदभाव केला जात नाही. ही नियमानुसारच करण्यात येत आहे. दोषी संचालक कोणत्याही पक्षाचा असू दे, त्याच्यावर कारवाई होणारच. त्यातून कोणीही सुटणार नाही. त्यामुळे असे गैरसमज करून घेणे योग्य नाही. (प्रतिनिधी)

एकरकमी ‘एफआरपी’ द्यावीच लागेल
साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपीची रक्कम द्यावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीशी सहमत असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

Web Title: Bulldozers for co-operative profanity