शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

पाडवा नव्हे व्यवसायावर ‘संक्रांत’, बांधकाम व्यावसायिक चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 07:09 IST

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला गृहखरेदी तेजीत असते. मात्र, कोरोनाची भीती, आर्थिक संकट आणि लॉक डाउनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के घरांचे बुकिंगही शक्य होईल, असे वाटत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मुंबई : आर्थिक मंदीमुळे डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोनाचा मोठा फटका बसणार असल्याची चिन्हे असून, पाडव्याच्या मुहूर्तावर गृहखरेदीवर जणू संक्रांत आल्याचे चित्र आहे. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला गृहखरेदी तेजीत असते. मात्र, कोरोनाची भीती, आर्थिक संकट आणि लॉक डाउनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के घरांचे बुकिंगही शक्य होईल, असे वाटत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.गेल्या दोन वर्षांत गृहनिर्माण आणि गृहखरेदीतील दरी प्रचंड वाढल्यामुळे, मुंबई महानगर क्षेत्रात बांधकाम पूर्ण झालेली जवळपास अडीच लाख घरे खरेदीददारांच्या प्रतीक्षेत आहे. त्याचप्रमाणे, बांधकाम सुरू असलेली सुमारे एक लाख घरे यंदाच्या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. कोरोनामुळे कोसळणाऱ्या आर्थिक संकटामुळे बांधकाम व्यावसायिकअभूतपूर्व कोंडीत सापडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. नवीन नोंदणी होत नसताना, ज्यांनी यापूर्वी घरे खरेदी केली, त्यांच्याकडून नियमित हप्ते थकविण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास अनेक बांधकाम प्रकल्पांचे काम बंद करावे लागेल, अशी निर्वाणीची भूमिका या व्यावसायिकांकडून मांडली जात आहे.नोटाबंदी, रेरा आणि जीएसटी हे तीन निर्णय बांधकाम व्यवसायावर त्सुनामीसारखे आदळले. गृहप्रकल्पांचा वित्तीय पुरवठा, एनबीएफसी, आयएलएफएस आणि डीएचएफएल संकटांनी त्यात भर घातली. २०२० साली गुढीपाडव्याच्या परंपरागत मुहूर्तावर गृहखरेदीला चांगल्या प्रकारे चालना मिळेल, ही आशा कोरोनाच्या भीतीमुळे मावळल्याची प्रतिक्रिया नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.प्रकल्पांना भेट देण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असून, त्याचा मालमत्तांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे उपाध्यक्ष अशोक मोहनानी यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, हे सांगणे तूर्त अवघड असल्याचे नाइट फ्रँकचे अध्यक्ष शिरिष बैजल म्हणाले.विकासकांचे सरकारला साकडेकोरोनामुळे बांधकाम व्यवसायच नाही तर २५० पूरक उद्योगही ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावे लागतील. हे संकट टाळण्यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे करायला हवा. विकास शुल्कात ७५ टक्के सवलत, चटई क्षेत्रफळासाठी भराव्या लागणाºया शुल्कात कपात, मुद्रांक शुल्क रद्द करणे, गृहनिर्माण आणि गृहखरेदीसाठी घेतल्या जाणाºया कर्जाच्या व्याजदरात कपात करून त्यांची पुनर्रचना यांसारखे काही निर्णय सरकारला घ्यावे लागतील असे मत एमसीएचआय क्रेडाईचे अध्यक्ष नयन शहा यांनी व्यक्त केले.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस