शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

आवाजावरून म्हशीनेच ओळखला आपला मालक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:20 AM

जामनेर पोलिसांची अनोखी शक्कल : दोन जणांनी केला होता हरविलेल्या म्हशीवर दावा

जळगाव : सव्वा वर्षापूर्वी हरविलेली म्हैस संबंधित मालकाला गावातच दिसली. मात्र सध्या ही म्हैस ज्याच्याकडे आहे, तोदेखील म्हशीवर दावा सांगू लागला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले, तेव्हा जामनेर पोलिसांनी चातुर्य दाखवित आवाजावरून ही म्हैस ज्याच्याकडे गेली, त्या मालकाकडे ती सोपविली.

येथील कुंदन विलास सुरवाडे (रा. भिमनगर, जामनेर) यांच्या मालकीची मोहरा जातीची म्हैस १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरविली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. मध्यंतरी त्यांना याच वर्णनाची म्हैस गोकूळ कडू पिसे (रा.दामले प्लॉट, जामनेर) यांच्याकडे आढळली. त्या वेळी त्यांनी आपली हरविलेली म्हैस दामले प्लॉट मध्ये असल्याचा दावा करीत परत मिळवून देण्याची मागणी केली.

पोलिसांनी दामले प्लॉट मधून म्हैस पोलीस ठाण्यात आणली व सुरवाडे व पिसे दोघांना साक्षीदारांसह बोलविले. दोघेही म्हैस आपलीच असल्याचे सांगत असल्याने पोलिसांसमोर पेच उभा राहिला. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी एक अनोखी शक्कल लढविली. त्या म्हशीला एका कोऱ्यात उभे केले व विरुध्द दिशेला पिसे व सुरवाडे यांना उभे केले आणि म्हशीला आवाज द्यायला सांगितले. आवाज दिल्यावर म्हैस ज्याच्याकडे जाईल तोच खरा मालक त्यानुसार दोघांनी दिलेल्या आवाजानंतर म्हैस पिसे यांच्यामागे येत त्यांच्याजवळ येऊन थांबली. अखेर पोलिसांनी ही म्हैस पिसे यांना सोपविली.पुरावे सादर करायानंतरदेखील म्हशीच्या मालकी हक्काबाबत कुणाकडे काही पुरावे असतील तर ते दोन दिवसांत सादर करण्याचे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.