शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Milind Narvekar: मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात कसे? आदित्य ठाकरेंनी बाहेर जाण्यास सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 07:16 IST

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. हे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी एकेक करून आमदार, मंत्री सभागृहात येत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानादेखील सोमवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात जाऊन बसले. आदित्य ठाकरे यांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितल्यानंतर ते बाहेर पडले. 

अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या सेंट्रल हॉलमधील अभिभाषणाने झाली. हे अभिभाषण सुरू होण्यापूर्वी एकेक करून आमदार, मंत्री सभागृहात येत होते. या ठिकाणी आमदारांशिवाय कोणालाही बसण्याची अनुमती नियमानुसार नसते. तरीही नार्वेकर हे आदित्य यांच्यासोबतच सभागृहात आले आणि आदित्य यांच्या मागील रांगेत बसले. तेव्हा त्यांच्याच एका सहकारी आमदाराने ही बाब आदित्य यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर, आदित्य यांनी नार्वेकर यांना निघून जाण्यास सांगितले. सत्तापक्षाकडून उगाच तुमच्या कृतीचे भांडवल केले जाईल, असेही त्यांनी नार्वेकरांना म्हटल्याचे कळते. त्यानंतर नार्वेकर लगेच सभागृहाबाहेर पडले आणि वर असलेल्या प्रेक्षक दीर्घेत जाऊन बसले. 

विधानसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा ते विधानसभागृहाच्या प्रेक्षक दीर्घेत बसले होते. आज सेंट्रल हॉलमध्ये आपण चुकून जाऊन बसलो, असा खुलासा नार्वेकर यांनी नंतर केला.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमर्थक आमदार संजय शिरसाट यांनी नार्वेकरांच्या आजच्या कृतीवर टीका केली. आमदार होण्याच्या इच्छेपोटी नार्वेकर मार्ग शोधत आहेत. पण, उद्धवजी आजकाल त्यांना फारसे जवळ करत नाहीत. तसे बरेच आमदार, नेते अन् नार्वेकरही आमच्या संपर्कात आहेत, असे शिरसाट म्हणाले. 

आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमदार व्हायची इच्छा आहे की नाही, हे तुम्ही त्यांना (नार्वेकर) विचारा. पण, मला वाटते, की ते चुकून सभागृहात आले. नंतर ते प्रेक्षक दीर्घेत जाऊन बसले.  

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरAditya Thackreyआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन