शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अर्थसंकल्प आयुक्तच करणार मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 01:15 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील कामाच्या व्यापामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास उशीर झाला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील कामाच्या व्यापामुळे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे यंदा आयुक्त दिनेश वाघमारे हे आपल्या अधिकारात अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करण्याची मुदत २० फेब्रुवारीपर्यंत असते. परंतु, या वर्षी महापालिकेची निवडणूक होती. अर्थसंकल्पाला विलंब होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आचारसंहितेपूर्वीच अर्थसंकल्प मंजूर केला होता. मात्र, पिंपरी महापालिकेला निवडणुकीमुळे प्रशासनाला अर्थसंकल्प सादर करता आला नाही. आता नवीन सभागृह अस्तित्वात येण्यास संपूर्ण मार्च महिना जाणार असल्यामुळे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आपल्या अधिकारात अर्थसंकल्पाला मंजुरी देणार आहेत. नंतर तो स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपुढे सादर केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर पहिले काम २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे आहे. महापालिकेत आता भाजप सत्ता स्थापन करणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या अर्थसंकल्पात काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करणे भाजपासाठी आव्हानाचे काम असणार आहे. सध्या शहरातील विकासकामांसाठी करामध्ये वाढ करणार का नाही, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. तसेच कर भरणाऱ्यांना सवलत मिळणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)>लवकरच होणार मंजूरनिवडणुकीमुळे आगामी २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासंदर्भात महापालिका प्रशासनाला लोकप्रतिनिधींची बैठकच घेता आलेली नाही. परंतु, निवडणुकीआधीच सर्व विभागांकडून आकडेवारी मागवून त्यावर प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यामध्ये काही दुरुस्त्या राहिल्या असल्यास त्या दुरुस्त करण्याचे काम निवडणूक संपताच हाती घेण्यात आले. त्यानंतर अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. नवीन महापौरांची निवड १४ मार्च रोजी होणार आहे. त्यानंतरच्या आठवड्यात स्थायी समिती सभापतींची निवड होणार आहे. दरम्यान, आयुक्त आपल्या अधिकारात अर्थसंकल्पाला मंजुरी देऊ शकतात. त्यानंतर स्थायी समितीत अर्थसंकल्प मांडून सर्वसाधारण सभेकडे पाठवण्यात येईल, असे महापालिका मुख्य लेखापाल दत्तात्रय लोंढे यांनी सांगितले.