राज्यातील अर्थसंकल्प 18 मार्चला होणार सादर

By Admin | Updated: February 27, 2017 17:15 IST2017-02-27T17:15:41+5:302017-02-27T17:15:41+5:30

केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर राज्यातील अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात राज्यासाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Budget to be presented on March 18 | राज्यातील अर्थसंकल्प 18 मार्चला होणार सादर

राज्यातील अर्थसंकल्प 18 मार्चला होणार सादर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27, दि. 27 - राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्च रोजी विधानसभेत सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सुधीर मनगुटीवार तिसऱ्यंदा अर्थसंकल्प सादर करतील. केंद्राच्या अर्थसंकल्पानंतर राज्यातील अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अर्थसंकल्पात राज्यासाठी काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्च रोजी सुरु होणार आहे. तर 18 मार्च रोजी सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या मिनी विधानसभा अर्थात महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पामध्ये काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Budget to be presented on March 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.