शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2020: संशोधन क्षेत्राला मिळणार नवसंजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 06:27 IST

अर्थसंकल्पात शिक्षण व संशोधनासाठी ९९ हजार ३०० कोटी एवढी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

- डॉ. आदित्य अभ्यंकर

अर्थसंकल्पात शिक्षण व संशोधनासाठी ९९ हजार ३०० कोटी एवढी मोठी तरतूद करण्यात आली आहे. याचे स्वागतच केले पाहिजे. त्यातच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे नमूद केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मूलभूत संशोधनाला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शिक्षण आणि उद्योगांसाठी ही चांगली बाब ठरणार आहे. कौशल्यविकासासाठी केल्या जात असलेल्या गेल्या पाच-सहा वर्षांनच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.

राष्ट्रीय पोलीस विज्ञान, न्यायवैद्यक विज्ञान आणि सायबर-न्यायवैद्यक विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणासुद्धा संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. प्रामुख्याने ‘क्वांटम कम्प्युटिंग’ क्षेत्राशी निगडित असलेल्या संशोधनाला पुढील काळात चालना मिळेल. भारतात टॉप मॉडेल कार डिझाईन, विमान डिझाईन कंपन्या नाहीत. त्यामुळे पुढील काळात एअर क्राफ्ट कंपन्या भारतात सुरू होऊ शकतील.वाढत्या लोकसंख्येनुसार देशाची ऊर्जेची मागणी वाढत चालली आहे. तसेच, पर्यावरणाचे प्रदूषण करणाऱ्या खनिजांचा वापर कमी करावा लागणार आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे.

मागील अर्थसंकल्पात ऊर्जाक्षेत्रासाठी कमी तरतूद होती. मात्र, यंदा सुमारे २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात सोलर एनर्जी, विंड एनर्जी क्षेत्राची गरज वाढेल आणि त्या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. भारतात परदेशी विद्यार्थी केवळ उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात.

यंदा ‘स्टडी इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत देशात येणारे परदेशी विद्यार्थी प्रामुख्याने संशोधनपर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतील. आशिया आणि आफ्रिका खंडांतील विद्यार्थ्यांनी देशात येऊन शिक्षण घ्यावे, यासाठी ‘इंड-सॅट’ ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जपान, द. कोरिया आणि आफ्रिका आदी देशांतील विद्यार्थीसुद्धा भारतात शिक्षण घेण्यासाठी येऊ शकतील. परिणामी, देशाला परकीय चलन मिळेल व देशाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सुविधेसाठी पीपीटी तत्त्वावर योजना राबविण्याचा शासनाकडून विचार सुरू असला, तरी त्याला कितपत यश मिळेल, यावर आत्ताच भाष्य करता येणार नाही.(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आहेत.)

निधीची गरज भासणार

संशोधन व शिक्षण क्षेत्रासाठी काही ठिकाणी एकत्रित तरतूद आहे. परंतु, नवीन शैक्षणिक धोरण्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यता आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे इतर कारणांसाठी निधीचा अभाव जाणवू शकतो. 

टॅग्स :budget 2020बजेटbudget expert speaksबजेट तज्ञांचा सल्लाtechnologyतंत्रज्ञानIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन