शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 11:48 IST

Sanjay Raut News: आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. 

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना गंभीर आजारपणामुळे सार्वजनिक जीवनापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय़ घ्यावा लागला आहे. सध्या आजारपणावर उपचार घेत असलेले संजय राऊत हे सोशल मीडियावरून आपली मतं मांडत आहेत. दरम्यान, आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी आले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले.

आपल्या बोचऱ्या टीकेने आणि टोकदार शब्दांनी विरोधकांचे वाभाडे काढणारे संजय राऊत यांना अचानक उदभवलेल्या आजारामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा अवघड निर्णय घ्यावा लागला होता. तेव्हापासून संजय राऊत हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. दरम्यान, आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत  यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

थकलेलं शरीर आणि तोंडावर मास्क लावलेले संजय राऊत भाऊ सुनील राऊत यांचा हात हातात घेत शिवाजी पार्कवर दाखल झाले. तिथे त्यांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर संजय राऊत बाहासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. आजारपणाचा सामना करत असतानाही संजय राऊत हे लढाऊ बाणा दाखवत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आल्याने उपस्थित शिवसैनिकही भारावून गेलेले दिसले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut, Ailing, Visits Balasaheb Thackeray Memorial, Supported by Brother.

Web Summary : Battling illness, Shiv Sena's Sanjay Raut visited Balasaheb Thackeray's memorial at Shivaji Park on his death anniversary. Supported by his brother, he greeted supporters, demonstrating resilience despite his health challenges. Raut's visit moved the gathered Shiv Sainiks.
टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबई