शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

...तर खंडित वीजपुरवठा लवकर पूर्ववत होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 5:15 AM

महावितरणच्या पुनर्रचनेबाबत कामगारांचा दावा; कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडल्यास दुरुस्तीस लागणार वेळ

- सचिन लुंगसे मुंबई : महावितरणची पुनर्रचना करताना प्रशासनाने कामगारांची भरती केली पाहिजे. कारण सद्य:स्थितीत महावितरणच्या सुमारे ८० हजार ९०० जागा मंजूर असल्या तरी प्रत्यक्षात कार्यरत कामगारांची संख्या ५५ हजार आहे. म्हणजे ३० ते ३५ टक्के जागा रिक्त आहेत. परिणामी, कामगारांच्या भरतीकडे दुर्लक्ष करून पुनर्रचना करण्यात आली, त्यानंतर एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाला आणि तो पूर्ववत करण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी पडली तर दुरुस्ती कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे, असा दावा महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला.प्रथमत: महावितरणच्या भांडुप परिमंडळातील वाशी आणि ठाणे सर्कल, पुण्यात गणेश खिंड आणि पुणे अर्बन सर्कल, कल्याण या तीन सर्कलमध्ये पुनर्रचना करण्यात येईल. हा भाग पूर्णत: शहरी आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत येथे वीज ग्राहक मोठ्या संख्येने वाढले आहेत. उपकेंद्र, लाइन्स वाढल्या आहेत. या घटकांप्रमाणेच पायाभूत सेवासुविधाही वाढल्या आहेत. पुनर्रचनेनुसार शहरीकरण असल्याने येथे चार उपविभाग असतील तर त्याचे दोन उपविभाग करण्यात येतील. एका विभागात वीज ग्राहकांना वीज बिल देणे, विजेच्या बिलानुसार पैसे वसूल करणे, बिल न भरल्यास नोटीस देत जोडणी तोडणे, ग्राहकाच्या तक्रारी सोडविणे; असा एक विभाग असेल. दुसºया विभागाअंतर्गत ग्राहकांना ज्या जोडण्या दिल्या आहेत; त्या जोडण्यांवर काही अडचणी आल्यास त्या सोडविणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे आणि ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करणे आदी कामे करण्यात येतील.ठाणे शहराचा विचार करता जेव्हा चार विभागाचे दोन विभाग केले जातील आणि सेक्शन म्हणजे प्रत्येक भागात एक-एक सेक्शन केले तर तेथे सेक्शन इंजिनीअर, अठरा कामगार काम करीत होते तेथे नव्या पुनर्रचनेनुसार अठरा कामगार आणि सेक्शन इंजिनीअर राहणार नाहीत. हे सगळे कामगार एका उपविभागात येतील. एका शिफ्टचा विचार केला तर एका शिफ्टमध्ये एक इंजिनीअर आणि दहा कामगार अशी शिफ्ट राहील. म्हणजे चार शिफ्टमध्ये चार इंजिनीअर आणि चाळीस कामगार असतील. यापूर्वी एका उपविभागात अशी स्थिती नव्हती.महावितरणची पुनर्रचना करण्यात आल्यास शहरी भागात अडचणी येतील. समजा एखाद्या भागात वीजपुरवठा खंडित झाला; तर तेथे काम करत असलेल्या कामगाराला तेथील जाळे माहीत असायचे. आता चारही सेक्शनमधील कामगार एका ठिकाणी काम करतील आणि उपविभागातून नियंत्रण राहील. समजा येथे वीजपुरवठा खंडित झाला तर तो वीजपुरवठा सुरळीत होण्यास वाढीव कालावधी लागेल. परिणामी, वीज ग्राहकांमध्ये संताप निर्माण होईल. पर्यायाने हा संताप किंवा रोष कामगारांवर येईल.प्रशासनाचा निर्णय एकतर्फीपुनर्रचनेला विरोध नाही. मात्र मोठा बदल करताना ग्राहकाला वेळेत सेवा मिळाली पाहिजे; ही सहाही कामगार संघटनांची मागणी आहे. प्रशासनाने प्रस्ताव मांडला तेव्हा कामगार संघटनांकडूनही प्रस्ताव मागविण्यात आले होते. आम्ही सूचना सुचविल्या. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर कामगार संघटनांचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा त्यांनी कौतुक केले. ऊर्जामंत्र्यांनी महावितरणच्या प्रशासनाला कामगार संघटनांच्या सूचना लक्षात घ्या, असे म्हटले होते. सहकार्य करीत कामगार संघटनांना सर्व माहिती देत निर्णय घ्या, असेही ऊर्जामंत्री म्हणाले होते. मात्र महावितरण प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत अंमलबजावणी केली. परिणामी, प्रशासन आणि कामगार संघटनांत मतभेद झाले. त्यामुळे कामगार संघटनांनी संप पुकारला.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनया आहेत कामगारांच्या मागण्याज्या ठिकाणी कामगारांची संख्या कमी आहे; तेथे कामगारांची भरती करा.८० हजार ९०० जागा मंजूर आहेत. प्रत्यक्षात काम करीत असलेले कामगार ५५ हजार आहेत. ३० ते ३५ टक्के जागा रिक्त आहेत.पुनर्रचना करताना रिक्त जागा भरा.रिक्त जागा न भरता पुनर्रचना केली तर पुरेसे कामगार उपलब्ध होणार नाहीत.कंत्राटी कामगारांची भरती करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही.कायमस्वरूपी कामगारांची भरती करा.कामगार सरप्लस झाले तर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर महावितरणकडे नाही.पदोन्नतीची संधी दिली पाहिजे.ज्या प्रमाणे ग्राहक संख्या वाढते आहे; त्या प्रमाणे कर्मचारी संख्या वाढली पाहिजे.कामगार संघटनांसोबत बैठक घ्या आणि काय मागण्या मान्य केल्या ते सांगा.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज