‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्याचे आज प्रसारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:07 IST2018-04-15T01:07:02+5:302018-04-15T01:07:02+5:30

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर -२०१८’ या कार्यक्रमाचा विशेष वृत्तांत रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवर सकाळी ११ वाजता व ‘एबीपी माझा’वर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

 Broadcasting of 'Lokmat Maharashtrian's The Year' celebrations today | ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्याचे आज प्रसारण

‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ सोहळ्याचे आज प्रसारण

मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर -२०१८’ या कार्यक्रमाचा विशेष वृत्तांत रविवारी, १५ एप्रिल रोजी ‘एबीपी न्यूज’ या वृत्तवाहिनीवर सकाळी ११ वाजता व ‘एबीपी माझा’वर रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली मुलाखतही यात पाहायला मिळणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी काय सांगितले? अभिनेत्री करीना कपूर-खान तैमूर विषयी काय म्हणाली?, याची उत्तरेही या कार्यक्रमात मिळतील. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साधलेला संवादही पाहायला मिळेल.

Web Title:  Broadcasting of 'Lokmat Maharashtrian's The Year' celebrations today