ब्रिजेश सिंह माहिती खात्याचे महासंचालक

By Admin | Updated: June 14, 2016 03:18 IST2016-06-14T03:18:24+5:302016-06-14T03:18:24+5:30

राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी ब्रिजेशसिंह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नियुक्ती केली. माहिती खात्यात पहिल्यांदाच

Brijesh Singh, Director General, Information Department | ब्रिजेश सिंह माहिती खात्याचे महासंचालक

ब्रिजेश सिंह माहिती खात्याचे महासंचालक

मुंबई : राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकपदी आयपीएस अधिकारी ब्रिजेशसिंह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नियुक्ती केली. माहिती खात्यात पहिल्यांदाच आयपीएस अधिकारी येत आहे.
या आधीचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांची बदली २७ एप्रिल रोजी आयुक्त; सीईटी या पदावर करण्यात आली होती. तेव्हापासून ओक यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. आज महासंचालक म्हणून ब्रिजेश सिंह यांच्या बदलीचे आदेश निघाले. ब्रिजेश सिंह हे सध्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या सायबर आणि महिलांविरोधी गुन्हे शाखेचे महानिरिक्षक आहेत. त्या पदांवर ते कायम असतील आणि माहिती महासंचालक पदाचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार असेल. सिंह हे १९९६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून ते माहिती तंत्रज्ञान विषयातील तज्ज्ञ आहेत. नागपूरच्या नामांकित व्हीएनआयटी या संस्थेतून त्यांनी बी.ई. केले आहे. सध्या ते पीएच.डी.करीत आहेत. ते
एक संवेदनशील लेखक, कादंबरीकार म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
१८ जूनला ते सूत्रे हाती घेतील.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Brijesh Singh, Director General, Information Department