लाचखोर समाजकल्याण उपायुक्त जाळ्यात
By Admin | Updated: July 22, 2015 00:46 IST2015-07-22T00:46:23+5:302015-07-22T00:46:23+5:30
दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना समाजकल्याण विभागातील प्रादेशिक उपायुक्त आणि शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

लाचखोर समाजकल्याण उपायुक्त जाळ्यात
पुणे : दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना समाजकल्याण विभागातील प्रादेशिक उपायुक्त आणि शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी पकडले. माधव रख्मा वैद्य यांची १३ दिवसांपूर्वीच उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती.
नरहरी तेली (४४) याच्याकरवी त्यांनी पैसे घेतले. नांदेड जिल्ह्यातील वसंतराव नाईक प्राथमिक शाळेतील चार प्राथमिक शिक्षक व स्वयंपाकी यांच्या पदांना मान्यता देऊन सेवेत सलग ठेवण्याबाबतच्या कागदपत्रांना मंजुरी देण्याचे अधिकार समाजकल्याण विभागाच्या लातूर उपायुक्त कार्यालयास होते. वैद्य यांची ४ जुलैला पुण्यात प्रादेशिक उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. संबंधित शिक्षण संस्थाचालकास त्यांनी मागील तारखेला प्रकरण मंजूर करण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी २ लाखांची लाच मागितली होती. लाच स्वीकारली जात असताना येथील समाजकल्याण कार्यालयात सापळा रचून पथकाने तेली यास पकडले. (प्रतिनिधी)