शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या लाचखोर महापौरांना अखेर अटक

By admin | Updated: February 5, 2015 10:25 IST

लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ५ - लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रक्तदाब वाढल्याने  रुग्णालयात दाखल झालेल्या माळवींना आजा डिस्चार्ज मिळाला आणि त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. आज दुपारी त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येईल.
एका जागेच्या प्रकरणात तृप्ती माळवी व त्यांचा सहकारी अश्वीन गडकरी लाच घेणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळाले असता, गेल्या आठवड्यात शुक्रवारी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. गडकरी यास अटक झाल्यावर न्यायालयाने जामीनावर सुटका केली. परंतू, गुन्हा दाखल झाला त्यावेळी रात्र असल्याने कायदेशीर बाबींनुसार तृप्ती यांना अटक करता आली नाही. या घटनेनंतर महापौर तृप्ती माळवी यांचा रक्तदाब वाढल्याने  रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. अखेर त्यांना आज जिस्चार्ज दिला व पोलिसांना त्यांना अटक केली
महापौर माळवी यांना लाच घेताना पकडल्याची माहिती  संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली. महापौर कार्यालयातील सर्व कर्मचारी तर या कारवाईवेळी अक्षरश: पळून गेले.या कारवाईमुळे संपूर्ण महापालिकेवर भीतीची छाया होती. आतापर्यंत काही अधिकारी लाच घेताना पकडले गेले असले तरी त्यांच्यावरील कारवाई ही महापालिकेच्या बाहेर झाली होती; परंतु ही कारवाई चक्क महापालिकेच्या कार्यालयात झाल्यामुळे संपूर्ण महापालिका हादरली.