शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

Maharashtra Kesari Result: सोलापूरचा वेताळ ठरला महाराष्ट्र केसरी; युवराज राक्षेचे काय झाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 21:46 IST

Vetal Shelke Maharashtra Kesari result News: विजेता वेताळ शेळके याला खांद्यावर घेऊन मिरवणूक काढण्यात आली. वेताळ हा सोलापूरचा आहे. 

- अफरोजखान पठाण

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत (जि. अहिल्यानगर) : येथे आयोजित ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला. शेळके याने आक्रमक खेळ करीत पाटील याच्यावर ७ गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकावली. या कुस्तीत पाटील याला अवघा एक गुण मिळविता आला. तो उपमहाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती जिंकल्यानंतर वेताळ शेळके याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.

यावेळी ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार रोहित पवार, धैर्यशील मोहिते, आमदार जितेंद्र आव्हाड, महादेव जानकर, किशोर दराडे, राजाभाऊ खरे, हेमंत ओगले, नारायण आबा पाटील, राजेंद्र फाळके, समरजीत घाडगे, कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेडच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक लढतीला मैदानात तुतारी आणि हलगीचा निनाद घुमत होता.------

शिवराजच्या लढतीकडे लागले होते लक्षअहिल्यानगरमध्ये फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे आयोजित ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत पंचाच्या निकालावर आक्षेप घेत, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती. या घटनेची राज्यभर चर्चा झाली. कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. दरम्यान, अंतिम लढतीच्या आधी उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगली. या कुस्तीत पृथ्वीराज याने शिवराजवर मात केली. यावेळी शिवराज याने तांत्रिक बाबी तपासण्याची मागणी केली होती. मात्र, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला.

मोहोळ, मोहिते कुटुंबीयांकडून गदा

महाराष्ट्र केसरी विजेता वेताळ शेळके याला दिवंगत मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ अशोक मोहोळ यांनी मानाची गदा दिली, तर उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास मोहिते कुटुंबीयांच्या वतीने धवलसिंह मोहिते यांनी गदा दिली. 

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाSharad Pawarशरद पवार