शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Sandip Deshpande: फरार संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा; एका अटीवर अटकपूर्व जामिन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 2:16 PM

Raj Thackeray Loudspeaker Row: राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांनी धरपकड सुरु केली होती. संदीप देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून पलायन करणाऱ्या मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींना आज मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांवर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 

राज ठाकरेंनी ४ मे पासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याबाबत दिलेला अल्टीमेटम संपला होता. यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांनी धरपकड सुरु केली होती. यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे ठाकरेंच्या बंगल्याबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांनी पोलिसांना झटका देऊन कारमध्ये बसून पलायन केले होते. या साऱ्या गदारोळात महिला पोलीस अधिकारी रस्त्यावर आदळली होती. यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल केला होता. 

अजामिनपात्र गुन्हा असल्याने देशपांडे गायब झाले होते. तर देशपांडेच्या कारच्या चालकाला अटक करण्यात आली होती. संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या साऱ्या प्रकरणावर संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे. त्यांच्या चालकाला देखील जामिन देण्यात आला आहे.

देशपांडेंनी सांगितला होता पोलिसी प्रोटोकॉल-महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दिली होती.

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे