शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या संवाद यात्रेला ब्रेक; शरद पवार यांना शह देण्यासाठी शहा-अजितदादा बंद दाराआड भेट

By यदू जोशी | Updated: July 23, 2024 08:49 IST

BJP Meeting in Pune: संवाद यात्रेबाबत एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय, पक्षश्रेष्ठींनी या यात्रेला अनुमती दिली नसल्याचे समजते. 

- यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेश भाजपच्यावतीने  राज्यात आयोजित करण्यात आलेल्या  संवाद यात्रेला पक्षश्रेष्ठींनी ब्रेक लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता या यात्रेचे स्वरूप बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पुन्हा एकदा संवाद यात्रांच्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची भूमिका प्रदेश भाजपने घेतली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल, महापालिका, नगरपालिकांच्या प्रभागांमध्ये संवाद यात्रा काढण्याचे नियोजन केले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या यात्रेला अनुमती दिली नसल्याचे समजते. 

या यात्रांद्वारे कोणाकोणाशी भाजप संपर्क साधणार आहे, असे  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट असेल. या आधी बावनकुळे  म्हणाले होते की, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये या यात्रा जातील, जनतेशी संवाद साधतील. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांची माहिती जनतेला दिली जाईल. मात्र, भाजपकडील संभाव्य मतदारसंघांवर यात्रांचा जास्त फोकस ठेवावा, असे भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींचे मत असल्याचे समजते. राज्यात व विशेषत: मराठवाड्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे तणावाची स्थिती आहे. संवाद यात्रेचा उद्देश कितीही चांगला असला तरी काही ठिकाणी संघर्ष झाला तर त्यातून चांगला संदेश जाणार नाही, असेही कारण सांगितले जात आहे.   

अमित शाह-अजित पवारांची पुण्यात भेटकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २० आणि २१ जुलै रोजी निमित्ताने पुण्यात होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बैठक झाली. शरद पवार यांना शह देण्यासंदर्भात मुख्यत्वे चर्चा झाली, असे समजते. शाह यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी भाजपच्या वीसेक ज्येष्ठ नेते, आमदारांशी चर्चा केली. 

संवाद बैठकांचा पर्याय आधी जाहीर केलेल्या भूमिकेनुसार संवाद यात्रा काढता येत नसतील तर विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवर प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी  संवादाच्या बैठका घेण्याचा पर्याय आता समोर आला आहे. यावर लवकरच निर्णय होईल. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार