नाफेडच्या तूर खरेदीला ‘ब्रेक’

By Admin | Updated: February 24, 2017 01:00 IST2017-02-24T01:00:10+5:302017-02-24T01:00:10+5:30

खरेदी केलेली तूर साठवण्यासाठी गोदामेच नसल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीला ब्रेक

'Break' for buying Nafed ture | नाफेडच्या तूर खरेदीला ‘ब्रेक’

नाफेडच्या तूर खरेदीला ‘ब्रेक’

वाशिम : खरेदी केलेली तूर साठवण्यासाठी गोदामेच नसल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. पाचपैकी तीन केंद्रे बंद करण्यात आली असून, येत्या चार दिवसांत उर्वरित दोन केंद्रेही बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. जिल्ह्यातील तीन ठिकाणी नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची पुन्हा पिळवणूक होत असून, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा खूप कमी दराने तुरीची खरेदी होत असल्याचे दिसत आहे.
यंदा जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. गतवर्षीपेक्षा १९ हजार हेक्टरनी तुरीचे क्षेत्र वाढले होते. त्यामुळे या पिकाच्या उत्पादनात थोडी वाढ झाली असल्याने बाजारात या शेतमालाची मोठी आवक होत आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटलच्या दरापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांकडून तुरीची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. अशात जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रीय सहकारी कृषी पणन महामंडळाकडून (नाफेड) तुरीची हमीभावाने खरेदी सुरू करण्यात आली. त्यामुळे नाफेडकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. जिल्ह्यात २२ फेब्रुवारीपर्यंत नाफेडकडून ७६ हजार क्विंटलहून अधिक तूर खरेदी करण्यात आली. त्यामध्ये नाफेडसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळाने (एमएससीएफ) वाशिम, अनसिंग, मालेगाव आणि कारंजात मिळून ५८ हजार ९०० क्विंटल तूर खरेदी केली, तर विदर्भ पणन महामंडळाने (व्हीसीएमएफ) मंगरुळपीर येथे १८ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी केली आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: 'Break' for buying Nafed ture