शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 20:12 IST

आळंंद  ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ...

ठळक मुद्देराहुल गांधींची कलबुरगीत सभाकाँग्रेसच नागरिकांना न्याय देवू शकेल - राहुल गांधी

आळंंद  (कर्नाटक) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचे गाजर, नोटबंदीमुळे तसेच जीएसटीमुळे सर्वसामान्य नागरिक व मध्यम व्यापारी नुकसानीत आले आहेत. विम्याच्या माध्यमातून हजारो कोटींचा घोटाळा प्रकरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. काँग्रेसच आगामी काळात शेतकरी व देशातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊ शकेल असे आश्वासक उद्गार अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी कलबुरगी येथे काँग्रेसच्या परिवर्तन  रॅलीमध्ये बोलताना काढले.

             पंतप्रधान मोदींच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीकाप्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, मोदी हे २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देत सत्तेवर आले, पण आजपावेतो त्यांनी एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. राफेल करारात मोठा  घोटाळा केला. फ्रान्सच्या अध्यक्षांनीच राफेलच्या कराराचे वास्तव उघडे केले आहे. भारत सरकारची एचएएल कंपनी असताना अननुभवी अनिल अंबानीना राफेलचे कंत्राट दिलेच कसे? असा सवाल केला. 

कॉंग्रेस संसदीय पक्षाचे नेते व कलबुरगी मतदार संघाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत आम्ही दिलेली आश्वासने पाळली आहेत व यापुढेही शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू असे उद्गार काढले. मोदींनी उद्घाटन केलेल्या योजना आमच्या काळातीलच आहेत,पण श्रेय मात्र ते घेत आहेत असे खरगे म्हणाले.-------काँग्रेसने आश्वासने पाळलीगरजू शेतकºयांची कर्जे माफ करण्याऐवजी मोदी यांनी उद्योगपतींची ३ लाख १५ हजार कोटींची कर्जे माफ केली.  बेरोजगार तरुणांना वर्षाकाठी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण गेल्या पाच वर्षांत फक्त २७ लाख जणांनाच रोजगारच मिळू शकला. नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर येण्याऐवजी सर्वसामान्यांना बाहेर ताटकळत ठेऊन आतल्या दारातून काळ्याबाजारवाल्यांचा पैसा मात्र पांढरा केला गेला. हे सर्व आजच्या तरुणाईला व सर्वसामान्य जनतेला कळायला हवे.

आम्ही आजपर्यंत जी आश्वासने दिली आहेत ती पाळली आहेत.  २००९ मध्ये कलबुरगी येथे आम्ही दिलेले ३७१( जे) कलम लागू करण्याचे आश्वासन पाळले असून, त्यामुळेच या मागास भागातील तरुणांना उच्च शिक्षण प्रवेशामध्ये व नोकरी मिळवण्यामध्ये सवलती मिळत आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरKarnatakकर्नाटकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRafale Dealराफेल डीलNote Banनोटाबंदी