मुलानेच वडिलांना लुटले
By Admin | Updated: August 16, 2014 02:34 IST2014-08-16T02:34:09+5:302014-08-16T02:34:09+5:30
येथील एका बड्या ज्वेलर्सच्या दुकानात त्याच्याच मुलाने १ कोटी २० हजार रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याची घटना समोर आली

मुलानेच वडिलांना लुटले
अंबरनाथ : येथील एका बड्या ज्वेलर्सच्या दुकानात त्याच्याच मुलाने १ कोटी २० हजार रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याची घटना समोर आली असून, वडिलांनी यासंदर्भात अंबरनाथ पोलिसांत मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील रेल्वे स्थानकाजवळ पिपाराम अमरजी प्रजापती (४९) यांचे कृष्णा ज्वेलर्स दुकान आहे. दुकानाचे मालक पिपाराम प्रजापती हे ९ एप्रिल ते १९ मे या काळात गावी असल्याने त्यांनी दुकानाचा व्यवहार मुलगा रमेश पिपाराम प्रजापती (२६) याच्याकडे सोपवला होता. याच काळात रमेशने मुंबई, कल्याण आदी शहरांतील विविध ज्वेलर्सकडून ४ किलो १८० ग्रॅम दागिन्यांच्या आॅर्डर घेतल्या होत्या. आॅर्डर घेतलेल्या सर्व दागिन्यांची किंमत १ कोटी २० हजारांच्या जवळपास असून, या सर्व दागिन्यांचा गैरव्यवहार केल्याचे पिपाराम यांच्या निदर्शनास आले असता यासंदर्भात पिपाराम यांनी मुलगा रमेशविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)