जुहू येथे दोघे तरुण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

By Admin | Updated: June 26, 2017 02:45 IST2017-06-26T02:45:16+5:302017-06-26T02:45:16+5:30

भरतीच्या वेळी समुद्रात पोहायला जाण्याचा अट्टाहास दोघा तरुणांना जीवघेणा ठरला. जुहूत कोळीवाड्याजवळ समुद्रकिनाऱ्यावर

Both young youths in Juhu; One of the bodies found | जुहू येथे दोघे तरुण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

जुहू येथे दोघे तरुण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भरतीच्या वेळी समुद्रात पोहायला जाण्याचा अट्टाहास दोघा तरुणांना जीवघेणा ठरला. जुहूत कोळीवाड्याजवळ समुद्रकिनाऱ्यावर दोघे जण बुडण्याची घटना रविवारी दुपारी घडली. अभिषेक प्रकाश मडव (२२) व अंकूर विजय बेटकर (१७)अशी त्यांची नावे आहेत. यापैकी अभिषेकचा मृतदेह मिळाला असून, बेटकर रात्रीपर्यंत सापडला नव्हता. रविवारी मोठी भरती असल्याने समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, अशी सूचना महापालिका व तटरक्षक दलाच्या वतीने देण्यात आली होती. मात्र, विलेपार्ले येथे राहाणारे अभिषेक मडव व अंकूर बेटकर दुपारी साडेतीनच्या सुमारास पोहण्यास गेले. मात्र, वेगवान लाटांमध्ये ते वेढले गेले. आरडाओरडीमुळे इतरांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. मात्र, तोपर्यंत ते पाण्यात बुडाले होते. तटरक्षक दलाच्या जवानांनी मडवचा मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Both young youths in Juhu; One of the bodies found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.